नवी दिल्ली – गेल्या 24 तासांत 56,110 एवढी आतापर्यंतची एका दिवसात बरे झालेल्या रुग्णांची संख्या नोंदवण्यात आली. जुलै महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बरे होणाऱ्या रुग्णांची दररोजची संख्या 15,000 होती, ती ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात 50,000 पेक्षा अधिकवर पोहचली.
जास्त रुग्ण बरे होत असल्यामुळे आणि रुग्णालयातून सुट्टी देण्यात आल्यामुळे आणि सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांना गृह विलगीकरणामुळे बरे झालेल्या रुग्णांच्या एकूण संख्येने 16 लाखांचा टप्पा ओलांडला आहे, त्यांची संख्या आता 16 लाख् 39 हजारांच्या पुढे गेली आहे. रुग्ण बरे होण्याच्या दराने 70.38 टक्के हा नवा उच्चांक गाठला आहे.
एकूण रुग्णांपैकी सक्रीय रुग्णांची संख्या 6 लाख 44 हजाराच्या जवळ म्हणजे केवळ 27 टक्के आहे. ते सध्या वैद्यकीय देखरेखीखाली आहेत. बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या सातत्याने वाढत आहे, त्यामुळे बरे झालेले रुग्ण आणि सक्रीय कोविड-19 रुग्ण यांच्यातील अंतर वाढून, सुमारे 10 लाख एवढे झाले आहे.
रुग्णालयातील सुधारित आणि परिणामकारक वैद्यकीय उपचारपद्धती, रुग्णालयात रूग्णांना आणण्यासाठीची रुग्णवाहिका सेवा सुधारुन अधिक समन्वय आणणे आणि कोविडच्या रुग्णांना तात्काळ उपचार मिळतील, अशी व्यवस्था करणे, अशा उपाययोजना सातत्याने केल्या गेल्या.
परिणामी, कोविडचा मृत्यूदर, जागतिक मृत्यूदराच्या तुलनेत सातत्याने कमी राहिला आहे. आज हा दर 1.98 टक्के एवढा आहे.
“टेस्ट, ट्रॅक, ट्रीट’ पद्धतीमुळे चाचण्यांचा नवीन उच्चांक गाठला आहे, गेल्या 24 तासांत 7 लाख 33 हजार 449 चाचण्यात करण्यात आल्या आहेत. यामुळे आतापर्यंतच्या एकत्रित चाचण्यांची संख्या 2.6 कोटींपेक्षा अधिक झाली आहे. तर, प्रती दशलक्ष लोकांमागे चाचण्यांची संख्या 18 हजार 852 वर पोहचली आहे.
श्रेणीबद्ध आणि वाढत्या प्रतिसादामुळे देशभरात चाचण्यांचे जाळे विस्तारीत करण्यात आले. आज देशात एकूण 1421 प्रयोगशाळा आहेत, यापैकी 944 प्रयोगशाळा शासकीय तर 477 खासगी आहेत.