सातारा -जिल्ह्यात रविवारी (दि. 23) रात्री जाहीर करण्यात आलेल्या अहवालांनुसार आणखी 443 नागरिकांना करोनाची बाधा झाली असून करोनाबाधितांच्या एकूण संख्येने दहा हजारांचा टप्पा ओलांडला आहे. जिल्ह्यातील नऊ बाधितांचा मृत्यू झाल्याची माहिती प्रभागी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.
सातारा येथील क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या ओंड, ता. कराड येथील 51 वर्षीय पुरुष, सोळशी, ता. कोरेगाव येथील 75 वर्षीय पुरुष, गुरुवार पेठ, सातारा येथील 68 वर्षीय महिला, चोरे, ता. कराड येथील 65 वर्षीय पुरुष, जिल्ह्यातील खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असलेल्या तामाजाईनगर, सातारा येथील 36 वर्षीय युवक, बनवडी, ता. कराड येथील 79 वर्षीय पुरुष, विक्रमनगर, पाटण येथील 65 वर्षीय पुरुष, रविवार पेठ, वाई येथील 71 वर्षीय पुरुष, तासगाव, ता. सातारा येथील 30 वर्षीय महिला या बाधितांचा मृत्यू झाला.
कराड तालुक्यामध्ये कराड शहरातील शनिवार पेठ सहा, मंगळवार पेठ पाच, रविवार पेठ, गुरुवार पेठ, शुक्रवार पेठ, उपजिल्हा रुग्णालय प्रत्येकी एक, शहरात अन्यत्र 13, मलकापूर शहरात आगाशिवनगर पाच, कोयना वसाहत एक, अन्यत्र तीन, तालुक्यात बनवडी पाच, हजारमाची चार, बेलवडे बुद्रुक तीन, ओंड, सावडे, वाठार, किवळ प्रत्येकी दोन, हरपळवाडी, मसूर, जुळेवाडी, खोडशी, कोडोली, वडगाव हवेली, काले, वाघेरी, बेलमाची, होटेवाडी, उंडाळे, पाल, कोपर्डे हवेली, गोवारे, रेठरे बुद्रुक प्रत्येकी एक, सातारा तालुक्यामध्ये राजेवाडी निगडी 81, सातारा शहरात रविवार पेठ सहा, मंगळवार पेठ पाच.