30 जुलै 2014 रोजी एका गावावर ओढावलेला तो काळा दिवस म्हणजे ‘एक होतं माळीण’. मात्र, त्या काळ रात्रीची घटना सांगणारा वास्तववादी चित्रपट ‘एक होतं माळीण’ लवकरच आता रुपेरी पडद्यावर येणार आहे. नुकताच या चित्रपटाचं पोस्टर देखील रिलीज करण्यात आलं आहे.
पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यामधील माळीण गावावर (30 जुलै 2014 रोजी) सकाळी आठच्या सुमारास गावकरी गाढ झोपेत असतानाच, काळानं निर्दयी झडप घातली. मुसळधार पावसामुळं डोंगरकडा कोसळून माळीण गावातली 44 घरं ढिगाऱ्यात गाडली गेली आणि सुमारे 725 वस्तीचं हे गाव होत्याचं नव्हतं झालं. या दुर्घटनेत अनेक नागरिकांचे बळी गेले असून, माळीण गावावर अक्षरशः दुःखाचा डोंगर कोसळला होता.