पुणे – करोनाच्या दुसऱ्या लाटेने थैमान घातले असतानाच पुण्यासाठी आशेचा किरण दिसू लागला आहे. गेल्या सहा दिवसांत शहरात नवीन बाधितांपेक्षा बरे होणाऱ्यांचा आकडा तब्बल 8 हजारांनी अधिक आहे. आता शहरातील लॉकडाऊन आणखी कठोर असल्याने पुढील आठवडाभरात हा आकडा आणखी कमी होण्याची शक्यता आरोग्य विभागाने व्यक्त केली आहे.
मागील आठवड्यापासून करोनाच्या नवीन बाधितांचा आकडा साडेपाच हजारांवर स्थिरावला आहे. त्याच वेळी चाचण्यांची संख्याही दररोज 24 ते 25 हजार असली, तरी दैनंदिन रूग्णसंख्या स्थिरावलेली आहे.
आरोग्य विभागाकडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, 16 ते 21 एप्रिल या सहा दिवसांत कालावधीत शहरात सुमारे 27 हजार 694 बाधित सापडले असून याच कालावधीत तब्बल 35 हजार 175 जणण बरे होऊन घरी गेले आहेत.