दिव्यांगांसाठी अखेर महापालिकेत रॅम्प

समाज विकास विभागाबाहेर रॅम्प नसल्याने होत होती फरफट

पुणे – महापालिकेच्या समाज विकास विभागात जाण्यासाठी अखेर भवन विभागाकडून रॅम्प उभारला आहे. दिव्यांगांच्या योजना तसेच त्यांच्यासाठीचे उपक्रम राबविणाऱ्या या विभागात जाण्यासाठी दिव्यांगांना पायऱ्या चढून जावे लागत होते. ही बाब दैनिक “प्रभात’ने “दिव्यांगांसाठी पालिकेचे दरवाजे बंद’ या वृत्ताद्वारे उघडकीस आणल्यानंतर प्रशासनाने तातडीने हा रॅम्प उभारण्यास सुरुवात केली आहे.

शहरातील दिव्यांगांसाठी महापालिकेकडून वेगवेगळ्या विकास योजना राबविल्या जातात. त्यासाठी अर्ज करणे तसेच या योजनांची माहिती घेणे तसेच त्यांच्या संबंधित कामांसाठी दिव्यांग व्यक्‍ती महापालिकेत येतात. त्यांना समाज विकास विभागाचे कार्यालयात जाणे सोपे जावे म्हणून हे कार्यालय तळमजल्यावर आहे. मात्र, त्या कार्यालयात जाण्यासाठी कुठेही रॅम्प नाही; तर जुन्या इमारतीच्या पश्‍चिमेच्या दुसऱ्या क्रमांकाच्या गेटवर एक रॅम्प बनविला होता. तो या कार्यालयात येण्यासाठी सोपा होता.

मात्र, आता प्रवेशद्वारऐवजी त्या ठिकाणी हॉटेल सुरू झाल्याने रॅम्प बंद झाला आहे. त्यामुळे पालिकेच्या जुन्या आणि नवीन इमारतीमध्ये कुठूनही दिव्यांग आत आले तरी, त्यांना समाज विकास विभागात जाण्यासाठी पायऱ्या चढूनच जावे लागत होते. तर पालिकेच्या पूर्व भागाच्या गेटपासून अवघा 4 फुटाच्या अंतरावर हा रॅम्प उभारायचा असला तरी, भवन विभागाकडून त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे दैनिक “प्रभात’ने समोर आणले होते. त्याची दखल घेत अखेर हा रॅम्प उभारण्याचे काम हाती घेतले आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.