A Raja Controversy । डीएमके नेते ए राजा पुन्हा एकदा वादात अडकण्याची शक्यता आहे. कारण त्यांनी पुन्हा एकदा वेगळ्या तामिळ राष्ट्राचा मुद्दा उपस्थित केलाय. मात्र हे करत असताना त्यांनी काही खळबळजनक वक्तव्य केले आहेत. ज्यामुळे नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. राजा यांनी “भारत मुळीच राष्ट्र नाही. ही गोष्ट नीट समजून घ्या. भारत हे कधीच राष्ट्र नव्हते. भारत हे एक राष्ट्र नसून एक उपखंड आहे.असे त्यांनी म्हटलंय.
भगवान हनुमानाची वानराशी तुलना A Raja Controversy ।
द्रमुकचे नेते ए राजा व्हिडिओसमोर आला आहे. त्यामध्ये त्यांनी, मी रामायण आणि भगवान राम मानत नाही. जर तुम्ही म्हणाल हाच तुमचा देव आणि भारत माता की जय, तर आम्ही ते देव आणि भारत माता कधीच स्वीकारणार नाही. त्यांना सांगा, आम्ही सर्व रामाचे शत्रू आहोत.” असे त्यांनी म्हटलं. तसेच त्यांनी “भगवान हनुमानाची तुलना माकडाशी केली आणि ‘जय श्री राम’चा नारा घृणास्पद असल्याचे म्हटले.
ए राजा काय म्हणाले ?
माजी केंद्रीय मंत्री ए.राजा यांनी ‘भारत हे अजिबात राष्ट्र नाही’ असे वादग्रस्त विधान केले. याविषयी बोलताना ही गोष्ट नीट समजून घ्या. भारत हे कधीच राष्ट्र नव्हते. एक राष्ट्र म्हणजे एक भाषा, एक परंपरा आणि एक संस्कृती. तरच ते राष्ट्र बनते. भारत हे एक राष्ट्र नसून एक उपखंड आहे.असे म्हटले.
याचे कारण स्पष्ट करताना, येथे तमिळ हे एक राष्ट्र आणि एक देश आहे. मल्याळम ही एक भाषा, एक राष्ट्र आणि एक देश आहे. ओरिया हे एक राष्ट्र, एक भाषा आणि एक देश आहे. या सर्व राष्ट्रांनी मिळून भारत बनवला तर भारत हा देश नाही. हा एक उपखंड आहे.असे त्यांनी म्हटलं.
‘तामिळनाडू, केरळ आणि दिल्लीच्या संस्कृती वेगळ्या आहेत’ A Raja Controversy ।
ए राजा पुढे म्हणाले, “तिथे अनेक परंपरा आणि संस्कृती आहेत. तामिळनाडूत आलात तर तिथली संस्कृती आहे. केरळमध्ये आणखी एक संस्कृती आहे. दिल्लीत आणखी एक संस्कृती आहे. ओरियामध्ये आणखी एक संस्कृती आहे.त्यामुळे विविधतेत एकता असूनही आपल्यात मतभेद आहेत. स्वीकार करा.