शिक्रापूर – येथील एका हॉटेलमध्ये दारू विक्रीवर चक्क दौंड उपविभागीय पोलीस अधिकारी ऐश्वर्या शर्मा यांच्या पथकाने कारवाई करीत दारू जप्त केली.
पोलीस शिपाई निखील भिवाजी रावडे यांनी शिक्रापूर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी रामू बकाराम लांजेवार (वय 50, रा. शिक्रापूर) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. चाकण रस्त्याजवळील हॉटेल साईकरुणा येथे विनापरवाना देशी दारूची विक्री होत असल्याची माहिती मिळाली.
त्यांनतर त्यांच्या पथकाने हॉटेलवर छापा टाकला. हॉटेलमध्ये एकाला पळून जाताना पकडले. त्याने हॉटेलमध्ये विक्रीसाठी ठेवलेल्या पाच हजार रुपये किमतीच्या दारूच्या बासष्ट बाटल्या जप्त केल्या आहेत. पुढील तपास सहायक पोलीस उपनिरीक्षक जयप्रकाश चव्हाण करीत आहेत.