शासकीय मेडिकल कॉलेजसह कोविड लॅबला दिली भेट
जळोची (वार्ताहर) – आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बारामती येथील शासकीय मेडिकल कॉलेजसह कोविड लॅबला भेट दिली. यावेळी त्यांनी याचवर्षी सुुरू झालेले मेडिकल कॉलेज व कोविड लॅबचे कामकाज समाधानकारक सुरू असल्याचे सांगून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.
यावेळी शासकीय मेडिकल कॉलेजचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे उपस्थित होते. टोपे म्हणाले की, मेडिकल कॉलेजची बांधणी उत्तम झाली आहे. शासकीय मेडिकल कॉलेजचे हे पहिले वर्षे आहे. तरीही कोविड लॅबचे कामकाज नियोजनबद्ध सुरू आहे. ही बाब कौतुकास्पद आहे. बारामती येथील करोना रूग्णांच्या संबधित व नागरिकांना देण्यात येणाऱ्या आरोग्य सेवेविषयी आढावा आरोग्यमंत्र्यांनी घेतला आहे.