कुत्र्यावरून दोन कुटुंबांत भांडण

पिंपरी – कुत्र्यावरून दोन कुटुंबांमध्ये कडाक्‍याचे भांडण झाले. याबाबत दोन्ही कुटुंबांनी परस्पर विरोधात गुन्हेही दाखल केले. हा प्रकार मंगळवारी (दि. 22) रात्री नऊ वाजता साईनगर, गहुंजे येथे घडला आहे.

ओंकार शिवशंकर सिंग (वय 59, रा. वाघजाई सोसायटी, साईनगर, गहुंजे) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार पोलिसांनी रवींद्र पोटफोडे, रवींद्र यांची पत्नी (पूर्ण नाव माहिती नाही), रोहन पोटफोडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. 

या फिर्यादीनुसार, ओंकार यांची सून रोमा सिंग मंगळवारी रात्री नऊ वाजता त्यांच्या घरासमोर कुत्र्याला बिस्कीट टाकत होती. त्यावेळी आरोपी रवींद्र यांच्या पत्नीने शिवीगाळ केली. फिर्यादी यांचा मुलगा काय झाले हे पाहण्यासाठी बाहेर आला असता आरोपींनी त्याला व फिर्यादी यांना हाताने व लोखंडी रॉडने मारहाण केली. 

याच्या परस्पर विरोधात रवींद्र पुरुषोत्तम पोटफोडे (वय 55, रा. वाघजाई सोसायटी, साईनगर, गहुंजे) यांनी फिर्याद दिली. त्यानुसार ओंकार सिंग, अमितकुमार सिंग, रोता सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोटफोडे यांच्या फिर्यादीनुसार, मंगळवारी रात्री आरोपींचे कुत्रे फिर्यादी यांच्या मुलाच्या अंगावर धावून आले. त्यावरून त्यांच्यामध्ये वाद झाला. आरोपींनी फिर्यादी, त्यांची पत्नी आणि मुलीला हॉकी स्टिक, लोखंडी पट्टी आणि लाथाबुक्‍क्‍यांनी मारहाण केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.