-->

इंदापूरजवळील भीषण अपघातात पुण्यातील दाम्पत्याचा मृत्यू

ट्रक चालक फरार; गुन्हा दाखल

इंदापूर – ट्रक व कार यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात पुण्यातील पती-पत्नीचा मृत्यू झाला. ही घटना रविवारी सकाळी विठ्ठलवाडी (ता. इंदापूर) वळणावर घडली.

 

 

पांडुरंग ताथवडे (वय 58) व रुक्मिणी ताथवडे (वय 50, दोघे रा. खडकी, पुणे; मूळ गाव केंदूर-पाबळ, ता. शिरूर) अशी मृत्यू झालेल्यांची नावे आहेत.

 

 

याबाबत इंदापूर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, टाटा ट्रक (एमएच 12 एमव्ही 7434) ही बावडा बाजूकडून इंदापूर बाजूकडे भरधाव जात असताना समोरून येणाऱ्या नेक्सॉन कारला (एमएच 12 आरएफ 2662) जोरदार धडक दिली. धडक एवढी प्रचंड होती, की कारचालक व त्यांची पत्नी यांच्या हात पाय व डोक्याला जबर मार लागून जागीच मृत्यू झाला.

 

 

यामध्ये ट्रक व कारचे प्रचंड नुकसान झाले आहे. ट्रक चालक फरार झाला असून चालकाविरोधात इंदापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक नारायण सारंगकर यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.