वडगाव मावळ – पतीचे अनैतिक संबंध असल्याने पतीसह सासरची मंडळी वारंवार गरोदर पत्नीचा छळ करत असल्याने दीड वर्षाच्या मुलासह गरोदर महिलेने स्वतःला पेटवून घेऊन आत्महत्या केली. मळवंडी ढोरे (ता. मावळ) येथे मंगळवारी (दि. 5) दुपारी 12 वाजता ही घटना घडली.
स्नेहा सोमनाथ ढोरे (वय 26) व दीड वर्षाची स्पर्श असे मृत्यू झालेल्या माय-लेकांची नावे आहेत. या प्रकरणी संतोष सोपान कुंजीर (वय 49, रा. गहुंजे, ता. मावळ) यांनी वडगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. वडगाव पोलीस ठाण्यात पतीसह सासू व नणंद या चौघांवर कलम 498 अ, 306 व 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वडगाव पोलिसांनी आरोपी पतीसह सासूला अटक केली. वडगाव मावळ न्यायालयाने आरोपींना शुक्रवारपर्यंत (दि. 8) पोलीस कोठडी दिली. दोन आरोपींना अद्यापही अटक करण्यात आली नाही.
सोमनाथ रामभाऊ ढोरे (वय 29), लक्ष्मीबाई रामभाऊ ढोरे (वय 67) दोघे (रा. मळवंडी ढोरे, ता. मावळ) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. या गुन्ह्यातील नणंद पिंकी चांदेकर (रा. आढले, ता. मावळ) व सुनीता सावंत (रा. गोडुंब्रे, ता. मावळ) या आरोपींना अद्यापही अटक केली नाही.
पोलीस निरीक्षक सुरेश निंबाळकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमनाथ ढोरे याचे बाहेर अनैतिक संबंध असल्याचा स्नेहा हिला संशय होता. यातून स्नेहा हिला पती सोमनाथ, सासू लक्ष्मीबाई, नणंद पिंकी व सुनिता या मयत स्नेहा सोमनाथ ढोरे हिचा वारंवार छळ करत होते. या छळाला कंटाळून मयत स्नेहा व तिचा मुलगा स्पर्श याच्यासह राहते घरात पेटवून घेऊन आत्महत्या केली. यात गंभीर जखमी झाल्याने जागीच मृत्यू झाला. मृतदेहाचे शवविच्छेदन डॉ. प्रवीण कानडे यांनी केले असून, मयत महिला सात महिन्याची गरोदर असल्याने पोटातील बाळाचापण मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक नितीन नम तपास करीत आहेत.