नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 72 व्या सैन्य दिना निमित्ताने चिनार कॉर्पसच्या पराक्रमाची प्रशंसा केली. पंतप्रधानांनी एका गर्भवती महिलेला जवानांनी वाचवतानाचा व्हिडीओ शेअर केला आहे.
Our Army is known for its valour and professionalism. It is also respected for its humanitarian spirit. Whenever people have needed help, our Army has risen to the occasion and done everything possible!
Proud of our Army.
I pray for the good health of Shamima and her child. https://t.co/Lvetnbe7fQ
— Narendra Modi (@narendramodi) January 15, 2020
जम्मू-काश्मीरमध्ये तापमान शून्यावर पोहचले आहे. जोरदार हिमवृष्टीमुळे रस्त्यांवरील वाहतूक ठप्प झाली आहे. अशा वेळी भारतीय सैन्य ग्रामीण भागात बचाव कार्य करते.
यासंदर्भात, भारतीय लष्कराच्या विशेष विंग चिनार कोर्प्सने नियंत्रण रेखा क्षेत्रातील गर्भवती महिलेस यशस्वीरित्या रुग्णालयात दाखल केले आहे. चिनार कॉर्प्सने आपल्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडिओ शेअर केला आहे.
चिनार कॉर्प्सने लिहिले की, अतिवृष्टीमुळे गर्भवती महिला शमीमा यांना आपत्कालीन परिस्थितीत रुग्णालयात दाखल करण्याची आवश्यकता होती. सुमारे चार तास, 100 जवान आणि 30 स्थानिक लोकांच्या मदतीने शमीम याना रग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला असून दोघेही सुरक्षित आहे.
या संदभात पंतप्रधान मोदींनी लिहिले आहे कि “आमची सेना आपल्या शौर्यासाठी ओळखली जाते. सैनिकांमध्ये लपलेल्या माणुसकीच्या भावनेसाठी भारतीय सैन्याचा आदर केला जातो.
पंतप्रधानांनी पुढे लिहिले,कि “जेव्हा जेव्हा मदतीची आवश्यकता असते तेव्हा सैन्याने सर्वतोपरी प्रयत्न करते. आम्हाला भारतीय सैन्याचा अभिमान असल्याचे पंतप्रधानांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे.