#LoveIsLove: ‘या’ गे कपलने शेअर केले प्री-वेडिंग फोटोशूट

नवी दिल्ली – सध्या लग्नाचे कार्यक्रम म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचे असतात ते म्हणजे फोटो, त्यातल्या त्यात हल्ली प्रत्येक लग्नात प्री-वेडिंग शूट केलाच जातो. यातच केरळचा समलैगिंक कपलच्याही प्री-वेडिंग फोटोशूटची चर्चा सध्या सोशल मीडियावर आहे. या कपलने त्यांचे प्री-वेडिंगचे फोटो शेअर करत हटके अंदाजात #LoveIsLove असं कॅप्शन दिले आहे.

दरम्यान, 32 वर्षाचे निवेद एंथॉनी चुल्लीकल आणि 27 वर्षाचे अब्दुल रहिम हे गे कपल केरळचे असून लवकरच ते लग्न करणार आहे. त्यांच्या या प्री-वेडिंग शूटचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच वायरल होत आहे. त्यांना याबाबत वृत्त माध्यमांनी विचारले असता निवेदने सांगितले,’आम्ही करून दाखवलं की, गे कपलचे फोटो शूट सुद्धा सर्वसामान्य कपल्स सारखे रोमँटिक असू शकतात. आम्ही नॉर्मल कपल्ससारखे लग्न करू इच्छितो त्यामुळे आम्ही प्री-वेडिंग शूट केले.’

दरम्यान,‘देशात समलैंगिकता बेकायदेशीर होता तेव्हा समाजाकडूनही या गोष्टीकडे नकारात्मक दृष्टिकोनातूनच पाहिलं जातं होते मात्र मागील वर्षी समलैंगिक संबंध गुन्हा नाही, असा ऐतिहासिक निकाल सुप्रीम कोर्टाने दिला त्यामुळे त्यांच्या प्रेमाची गोष्ट आजूबाजूचा समाजही तितक्या गोडीने ऐकेल, असं त्यांनी सांगितले.

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)