मुंबईत ४ मजली इमारतीचा भाग कोसळला

मुंबई – शहरातील लोकमान्य टिळक रोड परिसरात एका 4 मजली इमारतीचा काही भाग कोसळला आहे. या घटनेत अदयाप कोणतीही जिवितहानी झाली नसल्याची माहिती मिळाली आहे. या इमारतीच्या ढिगाऱ्याखाली कुणी अडकले नसल्याची माहिती मुंबई महापालिकेने दिली आहे.

ही इमारत रिकामीच असल्यामुळे धोका टळला आहे. दरम्यान, घटनास्थळी अग्निशामक दलाच्या ७ गाड्या दाखल झाल्या आहेत. यासोबतच रूग्णवाहिका आणि रेस्क्यू टिम घटनास्थळावर पोहचले आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)