सविंदणे – शिरूर जवळील नवले मळा येथे शिक्रापूर पोलीस स्टेशन येथे कार्यरत असलेले पोलीस शिपाई जितेंद्र केशव मांडगे यांनी बुधवारी सायंकाळच्या सुमारास विहिरीच्या राहतात दोरीच्या साहाय्याने गळफास घेतल्याची घटना घडली आहे.
मांडगे यांनी गळफास घेण्यापूर्वी एका नातेवाईकाला फोन करून मी आत्महत्या करत असल्याबाबतचे सांगून गळफास घेतला, काही वेळातच सदर ठिकाणी युवक गेले असता त्यांना जितेंद्र मांडगे यांनी विहिरीच्या रहाटास गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे दिसून आले .दरम्यान काही नागरिकांनी त्यांना उपचारासाठी शिरूर येथील माणिकचंद हॉस्पिटलमध्ये नेले असता तेथील डॉक्टरांनी जितेंद्र उर्फ हरिभाऊ केशव मांडगे वय ३४ वर्षे रा. पिंपरी ता. पारनेर जि. अहमदनगर चा मृत्यू झाल्याचे घोषित केले.
तर जितेंद्र मांडगे यांनी घरच्या वैयक्तिक टेन्शन मधून गळफास घेतला असल्याचे बोलले जात असून पोलीस वर्तुळात सदर घटनेमुळे खळबळ उडाली आहे, सदर घटनेबाबत शिरूर पोलीस स्टेशन येथे आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास शिरूर पोलीस करत आहे. जितेंद्र मांडगे यांनी यापुर्वी शिरूर पोलिस स्टेशनला धडाकेबाज काम केले आहे. त्यांच्या आकस्मित जाण्यान शिरुरकरांमध्ये , मित्र परीवाराकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.