ठाणे : पवार कुटुंबात फूट पाडण्याचा डाव? राष्ट्रवादी फुटेल असे षडयंत्र विरोधक रचत आहे. असा दावा काही दिवसांपूर्वी राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार यांनी केला होता. शिवसेनेनंतर राष्ट्रवादीला आणि पवार कुटूंबियांना टार्गेट करणार असल्याचेही त्याने म्हटले होते. आता अशातच ठाण्याचे माजी महापौर आणि एकनाथ शिंदे समर्थक नेते नरेश म्हस्के यांनी अजित पवार यांच्यावर टीका करताना मोठा गौप्यस्फोट केला आहे.
नरेश म्हस्के म्हणाले,’महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या निवडणुकीत अध्यक्षपदाच्या स्पर्धेत उतरलेले रोहित पवारांविरोधात अजित पवार यांनीच षडयंत्र रचल्याचा आरोप त्यांनी केलाय. गुरुवारी ठाण्यात एका कार्यक्रमात बोलताना पवार कुटुंबातच मतभेद असल्याचा दावा केला. यावरून आता राजकीय आरोप-प्रत्यारोप सुरु झाले आहेत. जानेवारी महिन्यात झालेल्या एमसीए निवडणुकीवरून आता राजकारण पेटण्याची चिन्ह आहेत.’ अस म्हणत त्यांनी पवार कुटूंबियात अलबेल नाहीये असाच खुलासा केला आहे.
अजित पवार यांच्यावर टीका करतांना पुढे म्हणाले,‘ पवार फॅमिलितील कोणती व्यक्ती रोहित पवार यांना पाडा म्हणून सगळ्यांना निरोप देत होते, अजित पवार साहेब, आधी आपलं घरातलं बघा आणि नंतर मुख्यमंत्र्यांवर टीका करा.’ असं वक्तव्य म्हस्के यांनी केल आहे.