डोळ्यात अश्रू, हातात प्लास्टिकची पिशवी; दोन महिन्यांनी तुरुंगाबाहेर येताना ‘अशी’ होती राज कुंद्राची अवस्था

मुंबई – द्योगपती आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे पती राज कुंद्राला 50 हजार रुपयांच्या जातमुचलक्यावर अश्लील चित्रपट प्रकरणात जामीन मिळाला आहे. तब्बल 62 दिवसांनी राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आला आहे. त्याच्यावर अश्लील चित्रपट बनवणे आणि ते प्रदर्शित करून विकणे असे गंभीर आरोप आहेत.

उद्योगपती आणि बॉलिवूड अभिनेत्री शिल्पा शेट्टीचे (Shilpa Shetty) पती राज कुंद्रा (Raj Kundra) यांना अश्लील चित्रपट प्रकरणात जामीन मिळाला आहे. तब्बल 62 दिवसांनी राज कुंद्रा तुरुंगातून बाहेर आला आहे. राज कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवणे आणि ते प्रदर्शित करून विकणे असे गंभीर आरोप आहेत. 50,000 रुपयांच्या जातमुचलक्यावर राज कुंद्राला जामीन मिळाला आहे.

तुरुंगातून बाहेर पडतानाचे कुंद्राचे फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहेत. या फोटोतील त्याची अवस्था पाहून लोक हैराण झाले आहेत.

फोटोंमध्ये दिसतेय की राज कुंद्राने सैल कपडे घातले आहेत. तो खूप कमजोर दिसतोय. त्याचे डोळेही अश्रूंनी डबडबले आहेत. त्याच्या हातात एक प्लास्टिकची पिशवी दिसते आहे. ती घेऊन तो माध्यमांना समोरा गेला. यावेळी त्याच्या कपाळावर टिळा देखील लावलेला होता, अर्थताच तुरुंगातून बाहेर येताच त्याने थेट देवाचे आशीर्वाद घेतले.

या फोटोंमध्ये राज कुंद्रा खूप कमजोर दिसत आहेत. त्याचे डोळे अश्रूंनी डबडबले आहेत, तर त्याने सैल कपडे घातले आहेत. हातात प्लास्टिकची पिशवी घेऊन तो माध्यमांना समोरा गेला. यावेळी त्याच्या कपाळावर टिळा देखील लावलेला होता, अर्थताच तुरुंगातून बाहेर येताच त्याने थेट देवाचे आशीर्वाद घेतले.

तुरुंगातून बाहेर पडलेला राज शारीरिकदृष्ट्या खूप कमकुवत दिसत आहे. राज कुंद्राने जिममध्ये घाम गाळून कमावलेले स्ट्रंट बिल्ड, बायसेप्स आणि छाती आता दिसत नाहीयेत.माध्यमांना टाळून तो आपल्या घराकडे रवाना झाला.

तुरुंगातून बाहेर पडलेला राज शारीरिकदृष्ट्या खूप कमकुवत दिसत आहे. माध्यमांना टाळून तो आपल्या घराकडे रवाना झाला. त्याचवेळी त्याने माध्यमांच्या एकाही प्रश्नाला कोणतेही उत्तर दिले नाही.

राज कुंद्राला पोलिसांनी 19 जुलै रोजी अटक केली होती, त्यानंतर त्याला सतत कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागले होते. राज कुंद्रावर अश्लील चित्रपट बनवण्याचा आणि वेब अॅप्लिकेशन प्रकाशित करण्याचा आरोप होता. या प्रकरणात शर्लिन चोप्रा आणि पूनम पांडे यांच्या नावांसह अनेक अभिनेत्रींनी राजवर आरोपही केले होते.

या प्रकरणात शिल्पा शेट्टीचीही चौकशी करण्यात आली होती, ज्यात तिने स्पष्टपणे सांगितले होते की तिचा या प्रकरणाशी काहीही संबंध नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.