अफगाणीस्तानात पडलेले विमान अमेरिकन लष्कराचे : तालिबान

काबूल : अफगाणस्तिानचे पडलेले विमान हे प्रवासी विमाम नसून अमेरिकेचे लष्करी विमान होते, अशी कबुली तालिबानचा प्रवक्ता झबिहुल्लाह मुजाहीद यांनी दिली.

स्थानिक पत्रकार तारीक गझनीवाल म्हणाला, जळते विमान पडताना मी पाहले. मी जळलेले दोन मृतदेह आणि अमेरिकेच्या लष्करी विमानाचा पूर्ण जळालेला पुढील भाग पाहिला आहे. मात्र त्याच्या दाव्याची तातडीने खातरजमा होऊ शकली नाही.

मुजाहीद म्हणाला, गझनी परगण्यात हे विमान पडले. त्यात अनेक अमेरिकन जवानांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेच्या तळापासून 10 किमीवर हे विमान कोसळले. या दाव्यावर प्रतिक्रिया देण्यास अमेरिकन लष्कराच्या प्रवक्‍त्या बेथ रीओडन यांनी नकार दिला. त्या म्हणाल्या लष्कर या प्रकरणाचा तपास करत आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.