140 प्रवाशांना घेऊन जाणारे विमान खोल पाण्यामध्ये क्रॅश

फ्लोरिडा- अमेरिकेच्या जॅक्सनव्हिले, फ्लोरिडा येथे 140 प्रवाशांना घेऊन जाणारे ‘बोइंग 737’ विमान क्रॅश झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. हे विमान फ्लोरिडामधील जॅक्सनव्हिले विमानतळावर लँडिंग करत होते. यादरम्यान विमान धावपट्टीवरुन घसरले आणि धावपट्टीच्या लगतच्या सेंट जॉन नदीत कोसळले. ही घटना शुक्रवारी रात्री विमान लॅंडिंगच्या वेळी घडली आहे. विमानामध्ये ऐकून 140 जणांपैकी 133 प्रवासी आणि 7 केबिन क्रू सदस्य होते.

चांगली गोष्ट म्हणजे विमान खोल पाण्यामध्ये क्रॅश झाले नाही. त्यामुळे विमान पूर्णपणे पाण्यात बुडाले नसून, विमानातील सर्व प्रवासी बचावले आहे. मात्र, या घटनेमध्ये विमानातील काही प्रवाशांना थोड्या फार प्रमाणात इजा झाली आहे. घटनास्थळी बचावकार्यासाठी ‘जेएसओ मरीन यूनिट’ पोलिसांना बोलवण्यात आले आहे. या दुर्घटनेचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.