लोणंद, (प्रतिनिधी) – तीन महिन्यापूर्वी विठ्ठलवाडी, ता. फलटण जि. सातारा येथील एका अल्पवयीन मुलीस पळवून नेणारास लोणंद पोलिसांनी सोलापूरातून ताब्यात घेतले. ऋषीकेश केशव जमदाडे (रा.विट्ठलवाडी ता. फलटण) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
संशयिताने सदर मुलीस अज्ञात कारणासाठी तिचे पालकांच्या ताब्यातून पळवून नेल्याची तक्रार लोणंद पोलीस ठाण्यात आली होती. पोलिसांनी गुन्हा संशयितावर गुन्हा दाखल केला होता.
गुन्ह्माचा तपास करताना पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम यांनी गोपनिय बातमीदारा मार्फत माहीती प्राप्त करून अल्पवयीन मुलीस पळवून नेण्याचा प्रकार त्याच गावातील ऋषीकेश केशव जमदाडे याने केला असल्याचे व तो फरार असल्याचे निष्पन्न केले.
संशयिताच्या मोबाईल नंबरच्या तांत्रीक माहितीचे आधारे पोलीस उपनिरिक्षक विशाल कदम व त्यांचे मदतनीस पोलीस कॉन्स्टेबल सुनील नामदास यांनी इत्यंभूत माहिती प्राप्त करून तळे हिप्परगा ता. उत्तर सोलापूर, जि.सोलापूर येथे राहत असलेल्या पडीत मुलगी व ऋषीकेश केशव जमदाडे याला ताब्यात घेवून अपहरणाचा गुन्हा उघडकीस आणला.
या कारवाईत सपोनि सुशील भोसले, पोलीस उपनिरीक्षक विशाल कदम पो. हवा. सर्जेराव सूळ, पो. कॉ. सुनील नामदास पो. कॉ.विद्ठल काळे यांनी सहभाग घेतला