‘दौंड शुगर’कडून पेमेंटही जमा

खासगी आणि सहकारी कारखान्यांत उसासाठी स्पर्धा सुरू

देऊळगावराजे – जिल्ह्यात सर्वात प्रथम दौंड शुगर कारखान्याने 2019 या चालु वर्षाचा 2700 रुपये ऊसदर जाहीर कारून खासगी कारखान्यांची ऊसदराची कोंडी फोडली आहे. चालू हंगामातील दि. 22 नोव्हेंबर ते दि. 30 नोव्हेंबर या कालावधीत गाळप झालेल्या उसाचे पेमेंट बॅंकेत दि. 9 डिसेंबर रोजी जमा करण्यात आल्याने उसाच्या तुटवड्यात खासगी आणि सहकारी कारखान्यांत उसदारासह पमेंट जमा करण्याचीही स्पर्धा यंदा पहायला मिळणार का, अशी चर्चा शेतकरी सभासदांत सुरू झाली आहे.

शेतकऱ्यांना शासनाच्या नियमाप्रमाणे किमान आधारभूत किंमत देणार असल्याचे, कारखान्याचे चेअरमन जगदीश कदम यांनी सांगितले. आलेगाव (ता.दौंड) येथील दौंड शुगर कारखान्याने चालू वर्षीच्या (2019-20)च्या गाळीत झालेल्या उसाला हा दर निश्‍चित करण्यात आला असून आज अखेर 1 लाख 11 हजार 990 मे. टन उसाचे गाळप केले असून 8.54% इतका सरासरी साखर उतारा मिळाला आहे. मागील हंगामात (2018-19) मध्ये 12.14 % सरासरी साखर उतारा होता, त्यानुसार हे पेमेंट वर्ग केले आहे.

महाराष्ट्र राज्याचे साखर आयुक्तांनी पंधरवडा पेमेंट वेळेत देण्याबाबत केलेल्या आवाहनास कारखान्याच्या संचालक मंडळाने प्रतिसाद देऊन यापुढील उसाचे पेमेंट पंधरा दिवसा ऐवजी दहा दिवसांच्या अंतराने बॅंक खात्यात वर्ग करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. चालु वर्षी 7 लाख टन उस गाळपाचे उद्दीष्ट आहे, कारखान्याचे दैनंदिन 7 हजार मेट्रिक टन गाळप होत आहे, परिसरात असणाऱ्या सर्व उसाचे गाळप कारखाना करणार असून तालुक्‍यातील जास्ती जास्त ऊस दौंड शुगरला देऊन शेतकऱ्यांनी सहकार्य करावे, असे आवाहन संचालक वीरधवल जगदाळे यांनी केले आहे. या कार्यक्रमा वेळी पूर्ण वेळ संचालक शहाजी गायकवाड, ऊस विकास अधिकारी संदेश बेनके, मुख्य शेती अधिकारी वाघ आणि कारखान्याचे अधिकारी उपस्थित होते.

कारखान्याकडून विविध योजना…
दौंड शुगर कारखान्यामार्फत विविध योजना राबविण्यात आल्या आहेत. यामध्ये खोडवा व्यावस्थापन, पाचट कुट्टीसाठी पाचटकुट्टी यंत्र नाममात्र भाडेतत्वावर उपलब्ध करून देणे, कारखान्यामार्फत ड्रिपची सुविधा उपलब्ध करुन देणे अशा योजनांचा यामध्ये समावेश आहे. या योजनाचा लाभ घ्यावा जास्तीत जास्त खोडवा राखून टंचाईच्या काळातही चांगल्या पद्धतीने ऊस व्यस्थापन करावे, असे आवाहन ऊस विकास अधिकारी संदेश बेनके यांनी केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.