अफगाणीस्तानात विमान कोसळले

काबूल : अफगाणीस्तानच्या एरीयान एअरलाईन्सचे एक विमान तालिबानच्या ताब्यात असणाऱ्या गझनी परगण्यात कोसळले, असे सरकारी सुत्रांनी सांगितले.

या परगण्याचे गव्हर्नर अरीफ नूरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, हे विमान दुपारी एक वाजून 10 मिनिटांनी कोसळले. देह याक जिल्ह्यात हे विमान पडले. या भागावर तालिबानचा ताबा आहे.

हे विमान का कोसळले, त्यात किती प्रवाशी होते, त्यात कोणी बचावले आहे का याची माहिती तातडीने समजू शकली नाही

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.