डोर्लेवाडी : बारामती तालुक्यातील मेखळी गावातील बरकडवाडी स्मशानभूमीमध्ये अर्धवट जळालेल्या अवस्थेत अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळून आला, यामुळे बारामती तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे.
घटनेची माहिती मिळताच बारामती तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश ढवाण यांनी घटनास्थळी भेट देत माहिती घेतली आहे.
या मृतदेहाचा घातपात झाल्याची शक्यता पोलिसांकडून वर्तवली जात आहे, मृतदेहाचा चेहरा पूर्णपणे जळाल्याने आरोपीला शोधण्याचे मोठे आव्हान पोलिसांसमोर आहे अधिक तपास तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक महेश चव्हाण करीत आहेत.