मांजरी – ‘आपले जेवण, आपल्या बांधवांसाठी’ या उपक्रमा अंतर्गत अरुण दादा बेल्हेकर राष्ट्रनिर्माण संस्थेचे संस्थापक शैलेश बेल्हेकर, व दत्तात्रय ननवरे यांच्या माध्यमातून मांजरी खुर्द येथील शेतकरी अशोक काशिनाथ आव्हाळे व माजी उपसरपंच सुनिता अशोक आव्हाळे यांनी गरजूंना एक वेळच्या जेवणाची व्यवस्था केली आहे.
शेतकरी अशोक आव्हाळे तसेच साईराज केटरिंगचे मालक बापुसाहेब शिवाजी पवार,संजय शिवाजी पवार यांनी लाॅकडाऊनच्या काळात गोरगरिबांना कमीत कमी एक वेळचे जेवण मिळावे या उद्देशाने मदत केली असून जेवण व सोबत एक पाण्याची बाटली देण्यात आली आहे.
करोना महामारीत पहिल्या दिवसापासून सामाजिक बांधिलकी जपत आपण जनजागृती करत आहे.तसेच हवी असेल ती मदत करत आहे. नागरिकांनीही स्वतःची काळजी घेत गोरगरिबांना जमेल तशी मदत करावी, असे आवाहन अशोक आव्हाळे यांनी यावेळी केले.