नित्यानंदवर अजामीनपात्र वॉरंट

बंगळुरू : कर्नाटकातील रामनगर न्यायलयाने स्वयंघोषीत अध्यात्मिक गुरू नित्यानंद याच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट काढले आहे. नित्यानंद याचा जामीन उच्च न्यायलयाने पाच फेब्रुवारी रोजी रद्द केला आहे. त्यामुळे सत्र न्यायलयात त्याच्या अटकेसाठी आदेश द्यावेत म्हणून गुन्हा अन्वेषण विभागाने अर्ज केला होता. न्यायलयाने नित्यानंदस्वामी उर्फ राजशेखरन याला ताब्यात घेऊन त्याच्या जामिनाची रक्कम जप्त करण्याचे आदेश दिले.

रामनगर न्यायलयात या खटल्याची पुढील सुनावणी चार मार्च रोजी होणार आहे. येथील सुरक्षा यंत्रणांना चकवा देत नित्यानंदने भारतातून पलायन केले आहे. त्याच्या आश्रमातील लहान मुलींवर बलात्कार केल्याचा गुन्हा आणि मुलींच्या अपहरणाचा आणि त्यांना शिविगाळ केल्याच गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

गुजरात पोलिसांच्या विनंतीनुसार नित्यानंदच्या शोधासाठी इंटरपोलने ब्ल्यू कॉर्नर नोटीस काढली आहे. हा वादग्रस्त महाराज चाळीस सुनावणींना अनुपस्थित राहिला आहे. तर त्याच्या बिदादी येथील आश्रमातून तो वर्षभरापासून बेपत्ता आहे.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.