शस्त्रक्रियेदरम्यान नऊ वर्षाची मुलगी वाजवत होती पियानो

नवी दिल्ली – कोणत्याही मोठ्या शस्त्रक्रियेआधी डॉक्टर रुग्णाला भूल देऊन त्याच्यावर शस्त्रक्रिया करतात. परंतु, मध्यप्रदेशस्थित ग्वाल्हेरमध्ये बेशुद्ध न करताच यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे.

नऊ वर्षीय सौम्या मध्य प्रदेशच्या मोरेना जिल्ह्यात वास्तव्यास आहे. मागील दोन वर्षांपासून तिला  फिट येण्याचा त्रास होता. २०१९ मध्ये सीटी स्कॅन केले असता तिच्या मेंदूजवळ ट्यूमर असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी तिला वेगवेगळी औषध देऊन पाहिली. परंतु, ट्यूमरचा आकार वाढतच असल्याने अखेर शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला.

ग्वाल्हेरच्या खासगी रुग्णालयात ८ डिसेंबरला डॉ. अभिषेक चौहान यांच्या तज्ज्ञ टीमने शस्त्रक्रिया करण्यात आली. यावेळी मेंदूची शस्त्रक्रिया सुरु असताना सौम्या चक्क जागी होती. त्यावेळी ती देशभक्तीपर गाणी म्हणत होती आणि पियानो वाजवत होती.  

या मुलीवर शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरांनी सांगितले की, सौम्यावर ‘अवेक क्रॅनियोटॉमी’ या आधुनिक पद्धतीने शस्त्रक्रिया करण्यात आली. या पद्धतीमध्ये शस्त्रक्रिया करताना थोडीशी जरी चूक झाली, तर त्याचे रुग्णावर गंभीर परिणाम होऊ शकतात, असे डॉक्टरांनी सांगितले. 

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.