पुणे – ड्रग्ज विक्रीसाठी आलेल्या एका नाजेरियन व्यक्तीस कोंढवा येथे अटक करण्यात आली. त्यांच्याकडून 10 लाख रुपयांचे 200 ग्रॅम कोकेन जप्त करण्यात आले आहे. ही कारवाई अंमली पदार्थ विरोधी पथक आणि कोंढवा पोलिसांनी संयुक्तपणे केली आहे. उबा सेव्हिअर गोडविन (वय 31) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोंढवा येथील ब्रह्मा अवेन्यू सोसायटीसमोर एक नायजेरियन इसम कोकेन विक्रीसाठी घेऊन येणार आहे, अशी खात्रीशीर पीएसआय महाडिक व त्यांच्या सहकाऱ्यांना गुप्त बातमीदाराकडून मिळाली होती. या माहितीच्या आधारे अंमली पदार्थ विरोधी पथक व पीएसआय महाडिक तसेच पोलीस कर्मचारी सापळा रचून नायजेरियन व्यक्तीस अटक केली. या नायजेरियन व्यक्तीकडून 10 लाखांचे 200 ग्रॅम कोकेन, 1,84,190 रोख रक्कम, एक मोबाईल फोन, होंडा बाईक असा एकूण 12,15,490 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.