हाॅकीत वर्ष २०२० पासून जागतिक मानांकनाची नवी पध्दत

लाॅसन : आंतरराष्ट्रीय हाॅकी महासंघाने २०२० या वर्षासाठी जागतिक मानांकनाची नवी प्रणाली तयार केली असून, ती प्रत्येक सामन्यातील खेळाडूंच्या कामगिरीवर आधारित असेल. यापूर्वी, ती प्रत्येक स्पर्धेतील कामगिरीवर आधारित होती. त्यामुळे खेळाडूंच्या कामगिरीचे अधिक अचूक असे प्रतिबिंब या मानांकनात दिसून येईल.

नवीन प्रणाली पुढील वर्षी १ जानेवारीपासून अंमलात येईल. एफआयएचने म्हटले आहे की, नवीन जागतिक क्रमवारीची प्रणाली १२ महिन्यांच्या परिश्रमपूर्वक संशोधन, विश्लेषण आणि चाचणीनंतर सुरू करण्यात येत आहे.

एफआयएच वर्ल्ड रँकिगची गणना करण्यासाठी नवीन यंत्रणा अस्तित्वात आल्यामुळे सध्याच्या प्लेसमेंटवर परिणाम होणार नाही. प्रत्येक राष्ट्र २०२० मध्ये त्याच क्रमवारीनुसार आपल्या कामगिरीची सुरूवात करेल.

Leave A Reply

Your email address will not be published.