ओम स्वीटूच्या मैत्रीत येणार प्रेमाचं नवं वळण

मैत्रीचा लॉकडाऊन संपून सुरु होणार प्रेमाचा अनलॉक. ओम करणार स्वीटू ला प्रपोज, काय असेल स्वीटू चं उत्तर

एका गोड नात्याची कथा सांगणारी झी मराठीवरील ‘येऊ कशी तशी मी नांदायला’ या मालिकेला प्रेक्षकांनी भरगोस प्रतिसाद दिला अल्पावधीतच हि मालिका लोकप्रिय झालेय, ‘अन्विता फलटणकर’ आणि ‘शाल्व किंजवडेकर’ ह्या फ्रेश जोडीने तरुणाईवर छाप सोडलेय.

 प्रत्येक पावलावर स्वीटूला मदत करणारा आणि तिच्या सोबत सावली सारखा उभा राहणारा ओम या दोघांमध्ये घट्ट मैत्री आहे. आता आता ही मालिका एका वेगळ्या वळणावर आली आहे, ओम आणि स्वीटूच्या मैत्रीचं प्रेमात रूपांतर होताना दिसणार आहे. ओम स्वीटू ला प्रपोज करणार आहे. स्वीटू ला देखील हे सुंदर क्षण खूप हवेहवेसे वाटतायत, काय असेल स्वीटू चं उत्तर?

आता ह्या दोघांमध्ये असलेली श्रीमंती आणि गरिबीची दरी या नात्यात अडथळा ठरेल? काय असेल मालविक, मोहित आणि मोमो ची प्रतिक्रिया? शकू(आई) आणि रॉकी च्या मदतीने ओम नलू मावशी आणि साळवी कुटुंबा कडून दोघांमध्ये बहरणाऱ्या या नवीन नात्याला होकार मिळवू शकेल? ह्या सर्व उत्तरांसाठी पाहत राहा येऊ कशी तशी मी नांदायला सोमवार ते शनिवार रात्री ८ वा. फक्त आपल्या झी मराठीवर.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.