Stock Market Opening | देशांतर्गत शेअर बाजारात आज तेजीसह सुरुवात झाल्याचे पाहायला मिळत आहे. यूएस फेडच्या निर्णयाचा तात्काळ परिणाम भारतीय बाजारावर दिसत असून सेन्सेक्स-निफ्टी विक्रमी उच्चांकावर उघडले आहेत. शेअर मार्केटमध्ये आज नवीन विक्रम झाला आहे.
आज सेन्सेक्सने 83,359.17 ची विक्रमी पातळी गाठली आहे. तर निफ्टी पहिल्यांदाच 25,500 च्या वर गेला आहे. यूएस फेडरल रिझर्व्हने व्याजदरात 0.50 टक्के कपात केली आहे. त्याचा परिणाम शेअर मार्केटवर झाला आहे. बँक निफ्टीही शेअर बाजारात नवीन शिखर गाठण्याच्या जवळ आहे.
बँक निफ्टीचा उच्चांक 53357 आहे आणि तो आजच त्याच्या सार्वकालिक उच्चांकावर जाण्याची शक्यता आहे, कारण तो फक्त 4 अंकांनी मागे आहे. बँक निफ्टीने सुरुवातीच्या मिनिटांत 53,353.30 हा दिवसाचा उच्चांक गाठला आहे. बँक निफ्टीचे सर्व शेअर्स वाढत आहेत आणि एचडीएफसी बँकेचे शेअर्स 1 टक्क्यांहून अधिक वाढले आहेत. एयू स्मॉल फायनान्स बँक आज बँक निफ्टीमध्ये सर्वाधिक लाभ घेणारी आहे.
आयटी शेअर्समध्ये वाढ
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअर्समध्ये जोरदार वाढ झाली आहे आणि एचडीएफसी बँकेने 1711 रुपयांच्या वर व्यापार करत आहे. काल आयटी शेअर्समध्ये घसरण झाली होती पण आज यूएस फेडरल रिझर्व्हच्या निर्णयामुळे आयटी शेअर्स प्रचंड वाढले आहेत.
सेन्सेक्समध्ये 30 शेअर्स लिस्टेड असून त्यापैकी 29 शेअर ग्रीन झोनमध्ये आहेत. एनटीपीसी, टेक महिंद्रा आणि टीसीएस या कंपन्यांच्या शेअर्समध्ये सर्वाधिक वाढ झाली. यूएस फेड रिझर्व्हने तब्बल चार वर्षांनंतर प्रथमच व्याजदर कमी केले असून अखेरीस मार्च 2020 मध्ये कपात केली होती.
गुंतवणूकदारांच्या संपत्तीत वाढ
दुसरीकडे एअरटेलच्या आणि बजाज फिनसर्व्हचे शेअर्समध्ये घसरण झाली. मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्येही खरेदीचा कल चांगला आहे. एकंदरीत बीएसईवर लिस्टेड कंपन्यांचे मार्केट कॅप 3.09 लाख कोटी रुपयांनी वाढलं आहे, म्हणजेच बाजार उघडताच गुंतवणूकदारांच्या संपत्तीत 3.09 लाख कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
हेही वाचा:
जागा वाटपटाचा तिढा सुटणार का ? संजय राऊत संतापले म्हणाले,’काँग्रेस बिझी आहे तारखेवर…’