नव्या आकाशगंगेचा शोध लागला

लंडन : आकाशामध्ये स्थित असलेल्या हबल या दुर्बिणीने पृथ्वीपासून 3 कोटी प्रकाशवर्षे दूर असलेल्या व आपल्या ब्रह्मांडाच्या पिछाडीस असलेल्या एका लहान आकाशगंगेचा शोध लावला आहे. या आकाशगंगेत अन्य आकाशगंगांच्या तुलनेत अत्यंत कमी तारे आहेत, अशी माहिती “मंथली नोटिसीस ऑफ द रॉयल ऍस्ट्रॉनॉमिकल सोसायटी लेटर्स’ जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आली आहे.

संशोधकांनी ताऱ्यांचा समूह असलेल्या “एनजीसी 6752′ मधील लघुग्रहांचा अभ्यास करण्यासाठी “नासा’ व “इएसए’च्या “हबल’ या टेलिस्कोपचा वापर केला. युरोपीय अंतराळ संशोधन संस्थेच्या (ईएसए) माहितीनुसार या संशोधनाचा मुख्य उद्देश म्हणजे आकाशगंगेच्या आयुष्याचा शोध घेणे हा आहे. या ताऱ्यांचा अभ्यास करण्याची प्रक्रिया सुरू असतानाच एका लघू आकाशगंगेचा शोध लागला. ही आकाशगंगा पृथ्वीपासून सुमारे 3 कोटी प्रकाशवर्षे दूर असून ती आपल्या ब्रह्मांडाच्या पिछाडीस आहे. या आकाशगंगेचा शोध लागणे हे न कळत मिळालेले यश समजले जात आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

या ताऱ्यांचा चमकदारपणा आणि तापमान यांचा अत्यंत काळजीपूर्वक विश्‍लेषण करता असे आढळून आले की, या ताऱ्यांचा समूह हा या आकाशगंगेतील सूर्यमालेचा भाग नाही. “बेदीन 1′ नावाच्या ब्रह्मांडाच्या शेजारील ही आकाशगंगा आकारात अत्यंत लहान आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)