सॅण्डविक कोरोमंटची महाराष्ट्रात गुंतवणूक 

मुंबई: सॅण्डविक कोरोमंट इंडियाने उत्पादकता व उत्पादनातील संशोधनासाठी पहिले जागतिक केंद्राचे पुणे येथे सुरू केले. कंपनीची अशा प्रकारची केवळ 6 केंद्रे आहेत. या केंद्रासाठी 27 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात आली आहे, असे कंपनीचे अध्यक्ष झेवियर गुएरा यांनी सांगितले. उत्पादकता, नफा, अत्याधुनिक संशोधन यात रुची असणाऱ्या कंपन्यांसाठी या केंद्रातून सेवा उपलब्ध होणार आहेत. भारतीय उत्पादन क्षेत्रातील संशोधन व क्षमता याबाबतचे कंपनीचे जागतिक स्थान पुण्यातील सॅण्डविक कोरोमंट केंद्राच्या माध्यमातून अधिक मजबूत होणार आहे. असे ते म्हणाले.
इनोव्हेशन कॉनक्‍लेव्ह 2018 मध्ये सॅण्डविक कोरोमंटच्या पुणे येथील केंद्रात भारतभरातून 2000 हून अधिक लोक येणार आहेत. येथे येणाऱ्यांना आधुनिक तंत्रज्ञान, उत्पादने, अभियांत्रिकी क्षमता या सेवांचा लाभ घेता येणार आहे. जगातील अन्य केंद्रांशीही ते जोडले जाणार असून या व्यतिरिक्‍त, विविध प्रशिक्षण उपक्रमांमध्येही सहभागी होण्याची संधी या केंद्राद्वारे देण्यात येणार आहे. पुण्यातील केंद्रात डिजिटल लाईव्ह मशिनिंग हे दुरस्थ ठिकाणांना लाईव्ह मशीन प्रात्यक्षिकाद्वारे (क्‍लाऊडच्या माध्यमातून) जोडणारे व्यासपीठही उपलब्ध आहे
-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)