मुंबई – छोटा पडदा गाजवणारी आणि बिग बॉसच्या सातव्या पर्वाची विजेती ‘गौहर खान’ हिच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. आज (दि. ५) गौहरच्या वडिलांचे निधन झाले आहे. गेल्या अनेक दिवसांपासून गौहरचे वडील रूग्णालयात भरती होते. मात्र, आज सकाळी त्यांनी अंतिम श्वास घेतला.
View this post on Instagram
गौहरची मैत्रिण प्रीती सिमोस हिने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत निधनाची माहिती दिली आहे. वडिलांच्या सेवेत गौहरने दिवसरात्र एक केला होता. दरम्यान, गेल्याकाही दिवसांपूर्वी गौहर खान आणि कोरिओग्राफर झैद दरबार विवाहबंधनात अडकले.
View this post on Instagram