‘या’ देशात सापडला सोन्याचा डोंगर; नागरिकांची झुंबड

ल्युहिनी (कॉंगो) – एखाद्या साहसी परिकथेमध्ये अचानक एखादा मोठा खजिना सापडावा, अशी स्थिती सध्या कॉंगोमध्ये सध्या निर्माण झाली आहे. कॉंगोतील एका डोंगराच्या मातीमध्ये मोठ्या प्रमाणावर सोने सापडायला लागले आहे. त्यामुळे या डोंगरावर नागरिकांनी एकच झुंबड करून खोदकाम करायला सुरुवात केली आहे. मात्र कॉंगोतील प्रशासनाने याची त्वरित दखल घेऊन या डोंगरावर कोणत्याही प्रकारचे खोदकाम करण्यास मनाई केली आहे.

कॉंगोतील साऊथ किवू प्रांतातील ल्युहिनी गावात हा डोंगर आहे. या ठिकाणे सोने सापडायला लागल्यानंतर गावकऱ्यांनी जी प्रचंड गर्दी केली, त्याचा एक व्हिडीओ एका मुक्‍त पत्रकाराने सोशल मिडीयावर पोस्ट केला आहे. काही गावकरी कुदळ फावडी घेऊन खोदकाम करायला लागले आहेत. तर इतर सामान्य गावकरी नुसत्या हातांनी माती उकरत असल्याचे आणखी एका व्हिडीओमध्ये दिसते आहे.
हा डोंगर ज्या पर्वतरांगांमध्ये आहे, त्या संपूर्ण पर्वतीय प्रदेशात सोन्याचे अंश मोठ्या प्रमाणात सापडू लागले आहेत.

लोक माती उकरून ती आपल्याबरोबर घरी घेऊन जाऊ लागले आहेत. ही माती चाळून आणि पाण्याने धुतल्यानंतर खाली सोन्याचे कण सापडत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे. ज्या गावात हा डोंगर आहे, त्या गावात स्थानिक लोकसंख्येच्या कितीतरी पट जास्त माणसे सध्या या गावात येऊन या सोन्याच्या खाणीमध्ये सोने शोधायला लागली आहेत. त्यामुळे स्थानिक प्रशासनाला तातडीने या भागात कोणतेही खोदकाम करण्यावर मनाई घालावी लागली.

कांगोमध्ये नेहमीच इमारतीसाठी लागणारे उंची लाकूड, हिरे आणि खनिज पदार्थांचा नैसर्गिक साठा आढळतो. देशात सोन्याच्या खाणीचे प्रमाणही अधिक प्रमाणात आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.