गोल्डकोस्ट (ऑस्ट्रेलिया) – निसर्ग कधी काय चमत्कार करेल हे सांगता येत नाही. ऑस्ट्रेलियात नुकताच असा निसर्गाचा चमत्कार समोर आला आहे. ऑस्ट्रेलियाच्या क्वींसलैंड राज्याची राजधानी असलेल्या गोल्डकोस्ट शहरात जन्मलेल्या एवलीन या महिलेबाबत हा चमत्कार घडला आहे. एव्हलिनच्या शरीरात जन्मतःच दुहेरी जनन यंत्रणा आहे. तिला दोन दोन योनी आणि दोन दोन गर्भाशय आहेत. महिलांच्या शरीरात असलेली संपूर्ण जनन यंत्रणा एव्हलिनच्या शरीरात दुप्पट आहे.
एकेकाळी वेश्या व्यवसाय करणारी एवलिन सध्या ३० वर्षाची आहे. ऑस्ट्रेलियातील बहुचर्चित रेडियो शो ‘काइली ऐंड जैकी ओ शो या कार्यक्रमात तिने याची माहिती दिली. अशा चमत्कारी आणि दुर्लभ शारीरिर्क अवस्थेमुळे तिला येणाऱ्या अनुभवाचे कथन तिने या कार्यक्रमात केले. ती सध्या ६ महिन्यांची गरोदर असून त्याचीही माहिती तिने दिली.
एव्हलिनच्या शारीरिक अवस्थेला वैद्यकीय भाषेत यूटेरस डिडेल्फिस असे म्हणतात. वेश्या व्यवसाय करताना एवलिन आपल्या या अवस्थेचा योग्य उपयोग करून घेत असे. उपलब्ध दोन योनींपैकी एका योनीचा वापर ती या व्यवसायासाठी करत असे. तिच्या प्रियकराला तिचा हा व्यवसाय पसंद नसल्याने ती अशा प्रकारे योनीचा उपयोग करीत असे वयाच्या २० व्य वर्षी तिला आपल्या या शारीरिक अवस्थेची कल्पना अली तेव्हा ती गरोदर होती आणि वैद्यकीय तपासणीत डॉक्तरांच्या लक्षात हि गोष्ट अली
डॉक्तरांनी दिलेल्या माहितीप्रमाणे एव्हलिनच्या दोन्ही योनी आणि गर्भाशय कार्यरॅट असून त्या दोन्ही मार्गाने ती गरोदर राहू शकते.