पुणे : मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरुन तिचे वडील आणि दोन भावांनी दगड आणि रॉडने मारुन १७ वर्षीय अल्पवयीन तरुणाची हत्या केली. वाघोली परिसरात ही घटना घडली.
या प्रकरणात लक्ष्मण पेटकर, नितीन पेटकर आणि सुधीर पेटकर यांना पोलिसांनी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणी पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सदर अल्पवयीन तरुण आणि लक्ष्मण पेटकर यांची मुलगी हे एकमेकांशी बोलायचे. मात्र, हे सर्व पेटकर कुटुंबाला मान्य नव्हते.
त्यावरून मंगळवारी मध्यरात्री अल्पवयीन मुलगा नेहमीप्रमाणे त्याच्या मित्रांसोबत फिरत असताना लक्ष्मण पेटकर, नितीन आणि सुधीर यांनी त्याला गाठले आणि जाब विचारत तिघांनी त्याला रॉडने मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर दगडाने हल्ला करून त्याचा खून केला.