अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्यास अटक

संगमनेर-अल्पवयीन मुलीच्या आई-वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन बळजबरीने तिच्यावर शारीरिक अत्याचार केला. त्यामुळे ती गर्भवती राहिली. याप्रकरणी घारगाव पोलिसांनी आरोपी फारूक नाना शेख (वय-32, रा. शेरी चिखलठाण, ता.राहुरी) यास अटक केली आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली अधिक माहिती अशी की, मार्च 2019 मध्ये धूलिवंदनाच्या दिवशी सकाळी साडेदहाच्या सुमारास संगमनेर तालुक्‍यातील एका अल्पवयीन मुलीला आरोपी फारूक शेख याने तिच्या आई वडिलांना जिवे मारण्याची धमकी देऊन बळजबरीने तिला मोटारसायकलवर बसविले. तसेच तिच्यावर शारीरिक अत्याचार केला.

त्यानंतर संबंधित पीडिता गर्भवती राहिली. याबाबत शुक्रवारी (दि.21) पीडित मुलीने वरील प्रकार पोलिसांना सांगितला. त्यानुसार घारगाव पोलिसांनी आरोपी फारूक शेख विरोधात गुन्हा दाखल केला आहे. उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी आरोपीस अटक केली.

Leave A Reply

Your email address will not be published.