आळंदी -लग्नाचे आमिष दाखवून अल्पवयीन मुलीला आळंदीत नेले. तिथे दोन ठिकाणी तब्बल महिनाभर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केले. हा प्रकार 1 ते 31 मार्च 2021 या कालावधीत घडला आहे.
चैतन्य शिवाजी पवार (वय 20, रा. इंद्रायणीनगर, देवाची आळंदी) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. याबाबत अल्पवयीन मुलीने दिघी पोलीस ठाण्यात गुरुवारी (दि. 1) फिर्याद दिली आहे. अल्पवयीन मुलीने आरोपीला फोन केला होता. फोनवर बोलताना आरोपीने मुलीला लग्न करण्याचे आमिष दाखवले.
आपण लग्न करून राहू’ असे म्हणत त्याने मुलीला आळंदी येथे बोलावून घेतले. तिथे काटे कॉलनी आणि इंद्रायणीनगर येथे 1 ते 31 मार्च या कालावधीत त्याने मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला असून दिघी पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे.