तळेगाव दाभाडेतील प्रकार : चौघांवर गुन्हा दाखल
मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेशाच्या आमिषाने
तळेगाव दाभाडे – व्यवस्थापन कोट्यातून बेंगलूरु (कर्नाटक) येथील पेगौडा मेडिकल कॉलेजमध्ये मुलीला वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेश मिळवून देण्याच्या आमिषाने चौघांनी मिळून सुमारे 74 लाख रुपयांचा गंडा घातल्याची घटना तळेगाव दाभाडे येथे घडली.
तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात मधुसूधनराव रामचंद्र नायडू (रा. हिंदुस्थान नाक्याजवळ, कांदेवली पश्चिम, मुंबई) यांनी फसवणुकीची तक्रार दिली आहे. त्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी फरार आहेत. सुनील रतोजा (रा. मलाड, मुंबई), निखील निरंजन (रा. खारघर, मुंबई), राजेश कुंभारे व व्यंकटेश (पूर्ण नाव माहित नाही. दोघे रा. बेंगलोर, कर्नाटक) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
पोलीस निरीक्षक (गुन्हे) शहाजी पवार यांनी दिलेल्या माहितीनुसार, मधुसूधनराव नायडु यांच्या मुलीला व्यवस्थापन कोट्यातून कॅंपेगौडा मेडिकल कॉलेज येथे एमडीचा प्रवेश देण्याचे आमिष दाखवत आरोपींनी रोख व डिमांड ड्राफ्टद्वारे एकूण 73 लाख 97 हजार 850 रुपये उकळले. आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक एस. बी. पोळ तपास करीत आहेत.