दुबई –आयपीएल स्पर्धेसमोरची संकटे काही केल्या कमी होण्याची चिन्हे दिसत नाहीत. चेन्नई सुपर किंग्ज संघापाठोपाठ आता दिल्ली कॅपिटल्स संघातील एका सदस्यालाही करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे.
दिल्ली कॅपिटल्स संघाच्या सहाय्यक फिजिओथेरपिस्टची करोना चाचणी झाली होती, त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याने सर्वांनाच धक्का बसला आहे. या सहाय्यकाला विलगीकरणात पाठवण्यात आले आहे. या सहाय्यक फिजिओथेरपिस्टच्या पहिल्या दोन्ही चाचण्या निगेटिव्ह आल्या होत्या. मात्र, तिसरी चाचणी पॉझिटिव्ह आली आहे.
अर्थात हे सदस्य चाचणी होण्यापूर्वी दिल्ली संघातील कोणालाही भेटलेले नव्हते तसेच कोणाच्याही संपर्कातही आले नव्हते. त्यामुळे संघाचा स्पर्धेतील सहभाग धोक्यात आला नसला तरीही पुढील काळात सर्व खेळाडू व सदस्य यांची पुन्हा करोना चाचणी करण्यात येणार आहे.