नवी दिल्ली – लोकसभा निवडणुकीत अभूतपूर्व यशानंतर सर्वांच्या नजरा भाजपच्या मंत्रिमंडळ विस्ताराकडे लागल्या आहेत. सध्या भाजप अध्यक्ष अमित शहा यांची पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळात वर्णी लागण्याची शक्यता आहे. अमित शहा यांचा मंत्रिमंडळात समावेश झाला तर पार्टीचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे. यानंतर पार्टीची धुरा कोणाकडे सोपविली जाणार, अशा चर्चांना उधाण आले होते. त्याच पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी 13 आणि 14 जूनदरम्यान विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रमुख नेत्यांची बैठक दिल्ली येथे बोलावली आहे. या बैठकीत पक्षसंघटनेमधील निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे.
लोकसभा निवडणुकीतील दणदणीत विजयानंतर भाजपाध्यक्षअमित शहा यांनी केंद्र सरकारमध्ये गृहमंत्रिपदाची जबाबदारी स्वीकारली आहे. भाजपामध्ये एक व्यक्ती एक पद असे धोरण अवलंबले जात असल्याने मंत्रिपद मिळाल्यानंतर अमित शहा हे भाजपाध्यक्षपदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. तसेच अमित शहा हे आपला उत्तराधिकारी म्हणून कुणाची निवड करतात, याबाबत तर्कवितर्क लढवले जात आहे. त्या पार्श्वभूमीवर अमित शहा यांनी 13 आणि 14 जूनदरम्यान विविध राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशातील प्रमुख नेत्यांची बैठक दिल्ली येथे बोलावली आहे. या बैठकीत पक्षसंघटनेमधील निवडणुकीबाबत चर्चा होणार आहे.
दरम्यान, लोकसभा निवडणुकीत गुजरातमधील गांधीनगर मतदारसंघातून अमित शहा मोठ्या मताधिक्याने निवडून आले आहेत. यानुसार अमित शहा यांच्याकडे महत्वाची जबादारी सोपविण्यात येणार असल्याचा चर्चा आहेत. भाजपा ‘एक व्यक्ति- एक पद’ या सिद्धांतावर काम करत असल्याने अमित शहा त्यांची मंत्रिमंडळात वर्णी लागल्यास त्यांना अध्यक्ष पद सोडावे लागेल. अमित शहा त्यांच्याजागी भाजप अध्यक्ष पदासाठी जेपी नड्डा आणि धर्मेंद्र प्रधान यांची नावे चर्चेत आहेत.