Welcome to the Jungle Teaser : ‘वेलकम टू द जंगल’ (Welcome to the Jungle) या बहुप्रतिक्षित कॅमेडी चित्रपटाचा टीझर अखेर प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांकडून त्याला जबरदस्त प्रतिसाद मिळत आहे. अभिनेता अक्षय कुमारच्या भन्नाट विनोदी अंदाजासह अनेक कलाकारांच्या कॉमिक टायमिंगमुळे हा टीझर पूर्णपणे मनोरंजनाने भरलेला दिसत आहे. टीझरची सुरुवात अक्षय कुमारच्या एका मजेशीर संवादाने होते. “या चित्रपटात काही घोडे आणि आम्ही सोडल्यास कोणत्याही प्राण्यांचा वापर केलेला नाही,” असा संवाद म्हणत तो प्रेक्षकांना हसवतो. Akshay Kumar अवघ्या दीड मिनिटांच्या या टीझरमध्ये विनोद, गोंधळ आणि धमाल प्रसंगांची रेलचेल पाहायला मिळते. एका दृश्यात सुनील शेट्टी अक्षय कुमारवर गोळ्या झाडत “तू मरत का नाहीस?” असा प्रश्न विचारतो. त्यावर अक्षयचं “मी मरण्यातच माझा जीव ओततोय” हे उत्तर प्रेक्षकांना खळखळून हसवत आहे. टीझरमधील प्रत्येक प्रसंगात विनोदाचा तडका आणि भन्नाट केमिस्ट्री दिसून येते. हा चित्रपट २६ जून रोजी प्रदर्शित होणार असून, आता प्रेक्षकांना चित्रपटाच्या ट्रेलरची उत्सुकता लागलेली आहे. कलाकारांची मोठी फौज (Welcome to the Jungle Teaser) या चित्रपटात कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळणार आहे. या चित्रपटात तब्बल 34 कलाकारांची भलीमोठी स्टारकास्ट आहे. यामध्ये अक्षय कुमारसह दिशा पटानी, जॅकलिन फर्नांडिस, अर्शद वारसी, जॅकी श्रॉफ, परेश रावल, रवीना टंडन, लारा दत्ता, जॉनी लीव्हर, तुषार कपूर आणि राजपाल यादव या कलाकारांचाही समावेश आहे. चित्रपटाचे दिग्दर्शक अहमद खान यांनी केले असून, आता वेलकम टू द जंगल (Welcome to the Jungle ) प्रदर्शनासाठी सज्ज आहे. चित्रपटाची निर्मिती फिरोज ए. नाडियादवाला यांच्यासह राकेश डांग आणि वेदांत विकास बाली यांनी केली आहे. हेही वाचा : Amrita Subhash : …पण बोल्ड सीनविषयी मात्र विचारलं जातं; अमृता सुभाषचं वक्तव्य चर्चेत