जगभर थैमान घालणाऱ्या करोनाने जगातील प्रत्येक घटकावर वेगवेगळी संकटे ओढावली. मात्र, या संकटाच्या काळात स्वत:च्या आजारपणाचीही पर्वा न करता शेकडो गरजवंताना मदतीचा हात देणारे नाव म्हणजे, कॅन्टोन्मेंट विधानसभा मतदारसंघाचे आमदार सुनील कांबळे होय.
करोनाच्या जीवघेण्या संकटात शेकडो मजूर, आर्थिक दुर्बल घटकांमधील कुटूंबावर उपासमारीची वेळ ओढावली असताना तब्बल 25 ह्जार अन्नधान्यांच्या किटच्या वाटपासह, लॉकडाऊनमध्ये मतदारासंघातील नागरिकांच्या सोयीसाठी शेतकऱ्यांच्या माध्यमातून थेट भाजीपाल्याची उपलब्धता, रोगप्रतिकार शक्ती वाढवण्याच्या औषधांचे वाटप, लॉकडाऊन मध्ये पुण्यात अडकलेल्या परराज्यातील मजूरांना पुन्हा घरी जाण्याची सुविधा, पायी घरी चालत जाणाऱ्या मजूरांना आर्थिक मदत अशा वेगवेगळया माध्यमातून आमदार कांबळे यांनी संकटाच्या काळात गोरगरिबांसाठी सर्वोतोपरी मदतीचा हात पुढे करत माणूसपण खऱ्या अर्थाने जपले आहे.
कॅन्टोन्मेंट रूग्णालयाचे रूपडे बदलले
करोना संकटाच्या काळात कॅन्टोंन्मेंट विधानसभा मतदारसंघाच्या अंतर्गत येणारे सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालय सक्षम करण्यावर आमदर सुनील कांबळे यांनी विशेष भर दिला. या रूग्णालयातील आयसीयू सुरू करण्यासह, या रूग्णालयात महापालिकेच्या हद्दीतील नागरिकांनाही करोनाचे उपचार मिळावेत यासाठी बेडची संख्या वाढविणे आणि या दोन्ही रूग्णालयात सांमजस्य करार घडवून आणण्यात आमदार कांबळे यांनी मोलाची भूमिका बजावली.
आमदार कांबळे यांनी करोना संकट सुरू होताच; या रूग्णालयातील अतिदक्षता विभागात तातडीच्या उपकरण खरेदीसाठी आमदार निधीतून 50 लाखांचा निधी उपलब्ध करून दिला. त्यानंतर लगेचच या आयसीयूच्या उभारणीसाठी राज्यशासनाच्या माध्यमातून सुमारे 2 कोटी 26 लाख, खासदार गिरिश बापट यांच्या खासदार निधीतून सुमारे 50 लाख, वेगवेगळया संस्थाच्या मदतीतून सुमारे 1 कोटींचा निधी असा तब्बल 4 कोटी 26 लाखांचा निधी या रूग्णालयास मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अमित कुमार सर व उपाध्यक्ष विवेक यादव यांच्याकडे सुपूर्द केला. त्यामुळे या रूग्णालयात 20 बेडचे आयसीयू तसेच करोना रूग्णांसाठीचे सुमारे 120 ऑक्सिजनची सुविधा असलेले बेड तयार झाले. त्याचा फायदा शेकडो गरिबांना झाला.
या आरोग्याच्या आणीबाणीच्या काळात कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल रूग्णालयात करोना रूग्णावरील उपचारासांठी राज्यशासन, आमदार निधी तसेच महापालिकेच्या माध्यमातून निधीसह अत्याधुनिक सुविधांचीही उभारणीही कांबळे यांच्या पुढाकाराने झाल्याने शेकडो गरीब रूग्णांना याचा लाभ झाला आहे.तर या कामाची दखल घेत रक्षा मंत्रालयानेही 2020 या वर्षाचा उत्कृष्ट कॅन्टोन्मेंट पुरस्कारही जाहीर करण्यात आला आहे. या शिवाय, ससून रूग्णालयाच्या सक्षमीकरणासाठीही कांबळे यांनी विशेष भूमिका बजाविली. या करोना कालावधीत वारंवार राज्यशासनाशी पत्र व्यवहार करून या रूग्णालयाच्या सक्षमीकरणासाठी आवश्यक सुविधांची मागणी केली आहे.
डॉक्टरांना पीपीई कीटचे वाटप
जनसेवा सहकारी बँक लि.च्या वतीने पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सरदार वल्लभभाई पटेल हॉस्पिटलच्या डॉक्टर, नर्से स यांना ‘कोविड-19’ म्हणजेच कोरोना या महामारीपासून बचाव करण्यासाठी आवश्यक असलेले एकूण 111 पी.पी.ई. किट देणगीच्या रूपाने बोर्डाचे मुख्य कार्यकारी अधिकारी मा.अमित कुमार सर व उपाध्यक्ष विवेक यादव यांच्याकडे आमदार सुनीलभाऊ कांबळे यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी बॅंकेचे विद्यमान संचालक मा. सचिन यादव आणि कॅन्टोन्मेंट बोर्डाचे विद्यमान नगरसेवक अतुल विनायक गायकवाड, नगरसेविका प्रियंकाताई श्रीगिरी, जॉईंट सी.ई.ओ. राहुल गजभिये आदी उपस्थित होते. पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या वतीने जनसेवा सहकारी बॅंकेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष व सर्व संचालक मंडळाचे मनःपूर्वक आभार मानण्यात आले.
40 हजार कुटूंबांना धान्यवाटप, थेट भाजीपालाही दिला कॅन्टोन्मेंट
विधानसभा मतदारसंघात मोठया प्रमाणात मजूर तसेच आर्थिक दुर्बल घटकातील नागरिकांची लोकवस्ती आहे. लॉकडाऊनमुळे या भागातील अनेक कुटूंबावर उपासमारीची वेळ आली होती. हे लक्षात घेऊन आमदार कांबळे यांच्या पुढाकारातून तब्बल 25 हजार कुटूंबाना अन्नधान्याचे वाटप करण्यात आले. कासेवाडी, लोहिया नगर, भवानीपेठ, ताडीवाला रस्ता, भीमनगर, आंबेडकर नगर, बी.टी कवडे, श्रावस्ती नगर, मंगळवार पेठ, रास्ता पेठ, पुणे स्टेशन या भागात हे अन्नधान्य वाटप करण्यात आले.
तसेच भाजीपाला खरेदीसाठी नागरीक गर्दी करत असल्याने आमदार कांबळे यांच्या पुढाकारातून मतदारसंघात मोठ्या सोसायट्यांमध्ये तब्बल 350 शेतकऱ्यांच्या माध्यमातून थेट ग्राहकांपर्यंत भाजीपाल्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली. त्यामुळे, नागरिकांनी गर्दी न केल्याने करोना प्रसार रोखण्यासाठी मदत झाली.