पुणे : चीनहून नुकताच परतलेल्या एकाला पुण्यात कोरोना विषाणू बाधीत संशयित म्हणून रूग्णालयात दाखल केले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील अशा संशयित बाधीतांची संख्या सहावर पोहोचली आहे., असे आरोग्य खात्याच्या ज्येष्ठ अधिकाऱ्यांनी सांगितले.
नायडू रुग्णालयाच्या विलगता कक्षात (आयसोलेटेड वॉर्ड) या संशयिताला सोमवारी दाखल करण्यात आले. त्याच्यात कोरोना बाधीताची लक्षणे आढळली आहेत, असे राज्याचे आजार सर्वेक्षण अधिकारी प्रदीप आवटे यांनी सांगितले. राज्यात सहा रुग्णांना वैद्यकीय देखरेखी ठेवले असून त्यात पुण्यात दोघांचा समावेश आहे, असे डॉ. आवटे यांनी सांगितले.
यातील एकाचीही रक्ताच्या आणि बडक्याच्या चाचणीचा अहवाल अद्याप पॉझिटीव्ह आला नाही. त्यामुळे एकही बाधीत अद्याप आढळला नाही, असे ते म्हणाले.
चीनमधून आभि वुहानमधून एक जानेवारीपासून परतलेल्या सर्व प्रवाशांची यादी मागवली असून त्यांच्या प्रकृतीची माहिती घेण्यात येणार आहे, असे आरोग्य खात्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.
ते म्हणाले, 18 ते 26 जानेवारी या काळात मुंबईत चीनहून परतलेल्या सुमारे तीन हजार 756 रुग्णांची माहिती घेण्यात येत आहे. याबाबत एक ही बाधीत आत्तापर्यंत सापडला नसल्याचे त्यांनी सांगितले.