नवी दिल्ली – आम आदमी पक्षाच्या गुजरात प्रदेश शाखेत मोठे फेरबदल करण्यात आले आहेत. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष गोपाल इटालिया यांची राष्ट्रीय सहसचिव म्हणून नियुक्ती करण्यात आली असून इसुदान गढवी यांना गुजरात प्रदेश अध्यक्ष बनवण्यात आले आहे.
नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षाचा मुख्यमंत्री चेहरा म्हणून इसुदान गढवी यांचे नाव जाहीर करण्यात आले होते. अध्यक्षांव्यतिरिक्त, आम आदमी पक्षाने गुजरातची संघटनात्मकदृष्ट्या सहा झोनमध्ये विभागणी केली आहे आणि प्रत्येक झोनसाठी स्वतंत्र कार्यकारी अध्यक्ष नेमण्यात आला आहे.
गुजरातमध्ये विधानसभेच्या पाच जागा जिंकल्यानंतर ‘आप’ला ‘राष्ट्रीय पक्ष’चा दर्जा मिळाला आहे. गुजरात मध्ये मिळालेल्या 13 टक्के मतांमुळेच आम आदमी पक्ष राष्ट्रीय पक्ष बनू शकला आहे असे या पक्षाचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी म्हटले आहे.
Tripura : भाजप व मार्क्सवादी कार्यकर्त्यांमध्ये जोरदार धुमश्चक्री
ते म्हणाले की, स्थापनेनंतर केवळ दहा वर्षात आम आदमी पक्षाला राष्ट्रीय पक्षाचे दर्जा मिळणे ही मोठी कामगिरी आहे.