पुणे : पुणे विमानतळावर धावपट्टीवर जीप शिरल्याने मोठा अपघात होता होता वाचला. त्यावेळी एअर इंडियाचे विमान उड्डाणाच्या अंतीम टप्प्यात असताना जीप आल्याने अर्नथ झाला असता.
दिल्लीला जाणारे एअर इंडियाचे ए 321 विमान उड्डाण करण्याच्या पवित्र्यात होते. त्याचवेळी धावपट्टीवर एक जीप आली. विमान चालकाने जीपला पाहिले. त्याने तातडीने नियंत्रण कक्षाशी संपर्क साधला.
या घटनेत कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. विमानातील सर्व 180 प्रवासी सुखरूप आहेत. मात्र या घटनेने विमानतळावर गोंधळ उडाला. या प्रकरणाच्या सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत.