वास आणि चव येत नाही मग कोरोना शक्‍य?

अद्याप पुरावा नसल्याचे तज्ज्ञांचे मत, अमेरिका अन्य देशांत संशोधन

नवी दिल्ली : वास आणि चव येणे बंद होणे हे या भयावह विषाणूची लागण झाल्याचे प्राथमिक लक्षण आहे, असे विविध देशातील बाधितांच्या अहवालाचा अभ्यास करण्याऱ्या तज्ज्ञांचे मत आहे.

विषाणूंच्या बाधेमुळे वास घेण्याची क्षमता कमी होते, यात नवे काही नाही. श्‍वसनावाटे विषाणूंची बाधा झाल्यास वास घेण्याची क्षमता कमी होते. कारण हे विषाणू वास घेण्याच्या क्षमतेत हस्तक्षेप करतात. मात्र विषाणूची बाधा नाहीसे झाल्यावर वासाची क्षमता पूर्ववत होते. काही रुग्णांमध्ये ही क्षमता कायमची नष्ट झाल्याचे दिसून आले आहे.

आता द. कोरीया, चीन आणि इटली येथून बाधित लोकांच्या वासाची क्षमता नाहीशी होते किंवा त्यात घट होत असल्याचा भक्कम पुरावा मिळाला आहे. ब्रिटीश रिनॉलॉजिकल सोसायटीचे अध्यक्ष आणि इएनटी, इंग्लंड यांनी काढलेल्या संयुक्त निवेदनात ही माहिती देण्यात आली आहे. द. कोरीयात पॉझिटिव्ह आढळेल्या 30 टक्के जणांना वास घेण्याची क्षमता नाहीशी झाली. तर अन्य रुग्णात काहीशी मंदावली असल्याचे त्यात म्हटले आहे.

त्यामुळे ताप, खोकला आणि श्‍वसनातील अडथळे ही लक्षणे न दिसणाऱ्या बाधितांसाठी हे लक्षण महत्वाचे ठरू शकते, असे त्यात म्हटले ाहे. याच स्वरूपाचे म्हणणे अमेरिकन अकॅडमी ऑफ ओटोलॅरींगोलॉजीच्या अहवालात मांडण्यात आले आहे. त्यात म्हटले आहे की, केवळ वासाची क्षमता कमी होते असे नव्हे तर चव घेण्याची क्षमताही या विषाणूग्रस्तांमध्ये कमी होते अथवा नाहीशी होते, असे त्यात म्हटले आहे.

अन्य कोणतेही लक्षणे आढळली नाहीत तरी ही समस्या आढळणाऱ्यांना कोरोनाची बाधा झाली असू शकते, असा सल्ला डॉक्‍टरांना त्यात देण्यात आला आहे. साऊथ चायना डेली पोस्टमध्ये प्रकाशित झालेल्या वृत्तातही वास घेण्याच्या क्षमतेत पॉझिटिव्ह रुग्णांच्यात घट झाल्याचे आढळून आल्याचे नमूद करण्यात आले आहे.

सध्या ठोस पुरावा नाही
वास आणि चव घेण्याच्या क्षमतेवर याचा काही परिणाम होतो का याकडे आम्ही लक्ष ठेवून आहोत, असे जागतिक आरोग्य संघटनेत साथींचे तज्ज्ञ मारीया व्हॅन केर्कहोव यांनी सांगितले. बोस्टन येथील मॅस्सुचसेटस डोळे आणि कान रुग्णालयातील नाक आणि सायनसचे तज्ज्ञ डॉ. एरिक होलब्रुक म्हणाले, याबाबतच्या माहितीकडे जगभरातील सर्व डॉक्‍टरांचे लक्ष लागले आहे. मात्र त्याबाबत अद्याप कोणताही पुरावा उपलब्ध नाही.

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.