रांजणगाव गणपती (प्रतिनिधी) – येथील कोरोनाची साखळी थांबते न थांबते तोच येथील एका स्थानिक दाम्पंत्याला कोरोनाची बाधा झाली आहे. अशी माहिती रांजणगाव प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय अधिकारी डाॅ. स्नेहल घोडेवार यांनी दिली आहे.
रांजणगाव गणपती येथे कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी ग्रामपंचायत प्रशासनाने व महसूल विभागाने सुरवातीलाच ठोस उपाय योजना केल्या होत्या. माञ टाळेबंदी शिथील होताच रांजणगाव गणपती येथे कोरोनाचा शिरकाव झाला होता. कोरोना बाधित सर्व रुग्ण कोरोनावर मात करुन घरी परतले आहेत. माञ औद्योगिक वसाहतीमध्ये पुण्यातील प्रतिबंधित क्षेञातून येणाऱ्या कामगारांमुळे औद्योगिक वसाहती लगतच्या गावांमध्ये कोरोनाचा शिरकाव झाला आहे.
रांजणगाव येथील सदर कोरोना बाधित युवक हा रांजणगाव औद्योगिक वसाहतीमध्ये एका नामांकित कंपनीत कामास असल्याने कंपनीतच कोरोनाची बाधा झाली आसल्याचे डाॅ.स्नेहल घोडेवार यांनी सांगितले.