चिंबळी, (वार्ताहर) – खेड तालुक्यातील चिंबळी परिसरातील नऊ दिवसांच्या गणपती बाप्पांचे भक्तीमय आणि शांततेत विसर्जन पार पडले.
शिव प्रतिष्ठान संल्गन नवमहाराष्ट्र मित्र मडाळांने विसर्जन मिरवणूकीमध्ये सीता स्वयंवर हा जिवंत देखावा सादर करून पारंपरिक पद्धतीने ढोल-ताशांच गजर आणि गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर याच्या घोषणांनी श्री गणेशाला भावपूर्ण निरोप दिला.
मिरवणूक पाहण्यासाठी गावातील व परिसरातील नागरिक व महिला वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी आळंदी पोलीस ठाण्याच्या वतिने बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
त्याचप्रमाणे पद्मावती तरुण मंडळ व भैरवनाथ गणेश मित्र मंडळ तसेच राजे शिव छत्रपती व हनुमान तरुण मंडळ आदि गणेश मडाळांच्या वतीने ढोल-ताशांच्या गजरात मिरवणूक काढून गणेश विसर्जन शांतेत केले. याप्रसंगी सरपंच, उपसरपंच, सर्व सदस्य, पोलीस पाटील व ग्रामस्थ उपस्थित होते.