पुणे – दिवसभरात करोनाने 8 रुग्णांचा मृत्यू झाला असून, त्यातील तीनजण पुण्याबाहेरील आहेत. तर, गेल्या 24 तासांत 135 करोनाबाधितांची वाढ झाली आहे. गेल्या शनिवारच्या तुलनेत हा आकडा निम्म्याने कमी आहे.
सोमवारी 2,901 जणांच्या स्वॅबटेस्ट करण्यात आल्या असून, बरे झालेल्या 202 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
एकूण बाधितांमध्ये ऍक्टिव्ह रुग्णांची संख्या 2,837 झाली असून, त्यातील 202 रुग्ण क्रिटिकल आहेत. आतापर्यंत 4,652 जण एकूण मृत्युमुखी पडले आहे.
दरम्यान, पिंपरी-चिंचवड शहरात करोनामुळे चार रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच दिवसभरात 80 नवीन बाधितांची नोंद झाली. तर 75 जणांना डिस्चार्ज देण्यात आला. शहरामध्ये आजपर्यंत 97035 जणांना करोनाची लागण झाली आहे.